HW Marathi
महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार | मुख्यमंत्री

नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी निश्चित होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (९ जून) दिल्लीतील प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत असलेल्या कोअर समिती सामील झाले होते. भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अमित शहा यांनी बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भाजपच्या कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, मंत्रीमंडळ विस्तार, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी आवश्यक निधी आदींच्या बाबतीत शहा यांच्यासोबत चर्चा करण्यात आली झाली. तर ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्षप जणार असल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगल्या आहेत. दिल्लीतील केंद्रीय समितीच्या बैठकीदरम्यान घेण्यात येणार आहे.

तसेच काल पार पडलेल्या बैठकीत भाजपचे केंद्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश, महाराष्ट्राचे संघटन मंत्री विजय पुराणिक,  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, आशिष शेलार, व्ही. वेणुगोपाल यांची उपस्थिती होती. भाजप मुख्यालयात जाण्यापूर्वी नवीन महाराष्ट्र सदन येथे कोअर समितीची बैठक झाली.

Related posts

“आता शेतकऱ्यांना मिळणार पगार”

News Desk

गुंतवणुकदारांच्या हितापोटी संबधिंत कंपन्यांची मालमत्ता, संपत्ती ताब्यात घेणार

News Desk

बँकांची कामे उरका; चार दिवस बँका बंद

News Desk