मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३७ व्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत त्रिवार अभिवादन केले आहे. मुख्यमंत्री ट्वीटमध्ये म्हणाले, “मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जीवनातील क्षण आणि क्षण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रखर देशभक्त, उत्कृष्ट लेखक, प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी, नाटककार आणि इतिहासकार असे पैलू होते.”
सामाजिक सुधारणा रुजविण्यासाठी त्यांनी क्रियाशीलपणे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार केला. या महान देशभक्ताचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. अशा बहुआयामी वीर सावरकर यांना शतशः नमन!
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 28, 2020
मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या ट्वीट म्हणाले, “सामाजिक सुधारणा रुजविण्यासाठी त्यांनी क्रियाशीलपणे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार केला. या महान देशभक्ताचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. अशा बहुआयामी वीर सावरकर यांना शतशः नमन!” तसेच मुख्यमंत्र्यांप्रामाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत स्वातंत्र्यवीर सावरकर आदरांजली अर्पण केली आहे. आणि मोदींनी ट्वीटसोबत मन की बात कार्यक्रमातील एक क्लिप शेअर करत विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दलता कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे. मोदींच्य मन की बात क्लिमध्ये म्हटले, ‘सावरकरांच्या साहसाला माझे नमन. ते कायमच त्याच्या शौर्यासाठी, स्वातंत्र्यलढ्यामध्ये इतरांना प्रेरणा स्थान म्हणून आणि सामाजिक सुधारणांमधील त्यांच्या कार्यासाठी, योगदानासाठी स्मरणात राहतील.’ असे ते म्हणाले.
On his Jayanti, I bow to the courageous Veer Savarkar. We remember him for his bravery, motivating several others to join the freedom struggle and emphasis on social reform. pic.twitter.com/o83mXmgp1S
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.