HW News Marathi
महाराष्ट्र

इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक, जगाला प्रेरणा देणारे ठरेल | मुख्यमंत्री

मुंबई | इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्याया आणि विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात ठाकरे म्हणाले.

डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे आगळेवेगळे स्मारक ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असून बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्याय आणि बंधुतेचा विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसाचे जीवन सुसह्य व्हावे, त्याला त्याचे हक्क मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. या कार्यासाठी प्रेरणादायी ठरणारे इंदू मिल येथील स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणारे नागरिक आणि भीमसैनिकांचे त्यांनी स्वागत केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, सामनातून टीका

News Desk

राज्य सरकारकडून अनलॉक-६ च्या गाईडलाईन्स जारी

News Desk

एससी-एसटी आरक्षण मुदत वाढीसाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन

News Desk