HW News Marathi
महाराष्ट्र

आमचे गरिबांचे सरकार, गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते !

नागपूर | “आमचे गरिबांचे सरकार आहे, गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले. महाविकास आघाडीचे सरकार हे रिक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले होते. “आमचे सरकार गरिबांचे, सर्वसामान्यांचे आहे. मात्र, देवेंद्रजी आमचे गरिबांचे सरकार आहे, गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना चिमटा काढला. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (१९ डिसेंबर) चौथा दिवस आहे. तर यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, “स्थगितीचे नाही तर प्रगतीचे सरकार”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ” सुधीर नका होऊ अधीर, झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार,” असा टोलाही ही ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला. संत तुकडोजी महाराजांची ‘पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे… शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या… ही कविता ऐकवून मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला काढला. “आमचे सरकार हे कमी बोलावे आणि जास्त काम करावे, ही आमची पद्धत आहे,” असे म्हणत विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती लवकरच बाहेर येईल | मुख्यमंत्री

एमएमआरडीएचे कर्ज महाराष्ट्राचे नाही म्हणतात फडणवीस. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “एमएमआरडीएचे कर्ज बुडवले तरी ते राज्याच्याच बोकांडीवर येईल.” “मी राज्याची बदनामी होऊ देणार नाही. मला भिती वाटतेय की राज्यपाल विचारतील की काय अभिभाषणावर बोलल्यावर हक्कभंग येतो काय? गोवर्धन उचलण्यासाठी सगळे आपआपल्या परिने प्रयत्न करु. विरोधक अभिभाषण सोडून दुसरेच बोलले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे आलेले अनेक उद्योगधंदे, उद्योजक आल्या पावली परत गेले. देशाची आर्थिक परिस्थिती कोमात जात असेल तर ही शरमेची गोष्ट आहे. मोदी-फडणवीसामुळे चांगले उद्योगी वातावरण होते. पण नोटबंदी आणि जीएसटीमुळे गुंतवणूक परत गेली,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईच्या हत्या प्रकरणी मुलाला जोधपूर येथूनअटक

News Desk

पहिले कोरोना टेस्ट किट जन्माला घातले आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला…

swarit

पंकजा मुंडेंनी भाजपची कार्यकारणी जाहीर केल्यानंतर टीमचे केले अभिनंदन

News Desk