मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्लाम्झा थेरपी झालेल्या १० रुग्णांपैकी ९ रुग्ण कोरोनातून बरे होत आहेत. या पार्श्वभूमीव ज्यांनी कोरोनावर यशस्वी मात केलेल्या लोकांनी स्वत: पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे. त्यामुळे आता बरे होऊ घरी गेलेल्या लोकांनी डॉक्ट्रारांशी संपर्क करून रक्तदानाप्रमाणे प्लाझ्माही दान करण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (२८ जून) जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
तसेच राज्यात अनेक ठिकाणी प्लाझ्मा उपचाराची केंद्रे उभारण्यात येत आहेत. कदाचित प्लाझ्मा थेरपीचा उपचारद्वारे कोरोना रुग्णांवर उपचार करणारा महाराष्ट्र हा देशात पहिला क्रमांक लागत असावा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. प्लाझ्मा कोणाचा वापरू शकतो? कोरोना होऊन बरे झालेत, त्यांच्या शरीरात ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्या रक्तगटानुरुप आपण वापरू शकतो. रक्तदानाप्रमाणे कोरोना बरा होऊन घरी गेलेल्या रुग्णांना विनंती आहे प्लाझ्मादान करा, असे मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही
महाराष्ट्रात ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, तर पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. अर्थचक्राला चालणा देताना मिशन बिगन अगेनच्या अंतर्गत अर्थचक्राला चालणा देतानासर्व सुरू करणार तर सहाजिकच राज्यातील रुग्णांच्या संख्येतही वाढ होणार आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. काही जिल्ह्यांमधून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द वापरत नसलो तरी काही बंधने मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.