HW News Marathi
महाराष्ट्र

MIM ने ऑफर देणे हे भाजपचे षडयंत्र; उद्धव ठाकरेंचा दावा

मुंबई | एमआयएमचा कट उधळून लावा, एमआयएमने ऑफर देने हे भाजपचे षडयंत्र आहे, असा दावा वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च) राज्यातील शिवसेनेच्या १९ खासदारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सत्ता मिळाली तरी एमआयएमशी हातमिळवणी करत नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेना एमआयएमसोबत जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. यातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेचे विचार गावोगावी पोहचवा, आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व सोडलेले नाही. भाजपचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. तर विरोधक हे विरोध करत राहणार आहेत. त्याच ताकदीने आपण त्यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे. बुडाखाली सत्ता हवी म्हणून एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे, अशी टीका त्यांनी केली. अफजल गुरुला फाशी देऊ नका असे म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी तुम्ही हात मिळवणी केली. तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे शक्य नाही. आणि मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळाली तरी एमआयएमशी हातमिळवणी करत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बालभारतीच्या ८ वीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख 

News Desk

इतक्या लाटा आल्या तरीही शिवसैनिकांनी आपला बालेकिल्ला राखला !

News Desk

शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी सेल्फी निर्णयाला तूर्तास स्थगिती -शालेय शिक्षणमंत्री तावडे

News Desk