HW News Marathi
महाराष्ट्र

“ही केमिकल लोचाची केस,” उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर खरमरीत टीका

मुंबई | मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी आज (१४ मे) एमएमआरडीच्या मैदानातून विरोधकांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात संजय दत्त यांच्या ‘लगे रोह मुन्नाभाई’च्या सिनेमाचा उल्लेख करत राज ठाकरेंवर टीका केली आहे. “सध्या स्वत: ला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. ते भगवी शाल घेऊन फिरतात आहेत. परंतु, मुन्नाभाई सिनेमाच्या शेवटच्या भागात कळते की, भेज्यात केमिकल लोच्या झालाय. ही केमिकल लोचाची केस आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर खमरीत टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मला एका शिवसैनिकांनी विचारले की, तुम्ही लगे रोह मुन्नाभाई पाहिलात का?, मी म्हटले की त्याचा काय संबंध, म्हणे त्या सिनेमात संजय दत्तला गांधीजी दिसतात. मग,संजय दत्त हा गांधीगिरी करायला लागतो. त्यापैकीच एक केस आपल्याकडे आहे म्हटले?, मी म्हटले कोण, ते म्हणाले, ती नाही का, स्वत: ला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. ते शाल घेऊन फिरतात हल्ली. कधी मराठीच्या नादा आणि कधी हिंदुत्वाचा नादाला लागतात. पण, मी म्हटले की, मुन्नाभाई लोकांचे भले तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढला. मी म्हटले तुम्ही मुन्नाभाई सिनेमाचा शेवट बघितला नाही का?, यात संजय दत्तला कळते की, आपल्या भेज्यात केमिकल लोच्या झाला. ही केमिकल लोचाची केस असून हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. असे मुन्नाभाई फिरताना, फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचे तर जाऊ द्या.  आदित्य पुन्हा चालला आहे. “

केंद्र सरकार टिनपाटांना झेडप्लस सुरक्षा देते, सोमय्यांवर टीका

 “टिनपाटांना झेडप्लस सुरक्षा देत आहात. मात्र, काश्मिरी पंडितांना सुरक्षा देत नाही. पण, इकडे भोके पडलेल्या टिनपाटाना केंद्राची झेडप्लसची सुरक्षा देत आहात. कुणाला वाय प्लस, कुणाला झेड प्लस काय बापाचा काम आहे?, हा लोकांचा पैसा आहे तो. ज्यांना केंद्राने सुरक्षा द्यायला पाहिजे, त्यांना ते देत नाही. ही असली गळकी टिनपाटे काय उपयोगाची तुम्हाला, टिनपाट हा सभ्य शब्द बोलतो, मला तर टमरेलच बोलायचे होते, अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

 

Related posts

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला NCBकडून क्लिनचीट

Aprna

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य

Aprna

आपली खरीप पिकं आता सुरक्षित राहणार !

News Desk