मुंबई। देशात कोरोनाचा प्रादुर्भावा वेगाने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२४ मार्च) संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित केले आहे.
I want assure all my fellow citizens that the guidelines for Maharashtra stays as is. All the essential services & goods will be available. I appeal to the people to not panic or be confused, the Maharashtra Government is with you. Please do not gather on the streets or in shops.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 24, 2020
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे . राज्यात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी काळजी करून अनावश्यकरित्या दुकानामध्ये गर्दी करू नये अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आश्वस्त केले आहे.
पंतप्रधानांच्या घोषणेने लोकांनी घाबरून जाऊन दुकानांमध्ये गर्दी केली , माझ्यापर्यंत या बातम्या पोहचल्यावर मी स्वत: पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की आम्ही महाराष्ट्र लॉकडाऊनची कालच घोषणा केली आहे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू मिळतील तसेच अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील अशी व्यवस्था केली आहे. पंतप्रधानांनी युरोपमध्ये परिस्थिती कशी भीषण बनत गेली यासंदर्भात आपल्याला माहिती दिली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या देशात असे होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.
राज्यात मी आधीही सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधी , दुध , भाजीपाला व्यवस्थित पुरवठा होत राहील. यामालाची ने आण करणारी वाहतूक सुरळीत सुरु राहील याची खात्री बाळगा, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिला.
कोरोनासंदर्भातील माहिती व्हाट्सॲप हेल्पलाईनची घोषणा
संपूर्ण देशात आज मध्यरात्रीपासून लॉगडाऊन होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करतात मुख्यमंत्र्यांनी देखील राज्याचे एक नवीन कल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना संदर्भात माहिती देणाऱ्या व्हॉट्सॲप हेल्पलाईनची घोषणा केली आहे कोरोनाविषयक माहिती नागरिकांना अधिकृतरित्या मिळावी यासाठी राज्य शासनाने +९१२०२६१२७३९४ या क्रमांकाचा व्हॉटसएप चॅटबॉट ग्रुप सुरु केला आहे याचाही लाभ नागरिक घेऊन माहिती घेऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांची माहिती सध्या इंग्रजीत व कालांतराने इतर भाषांतही मिळेल.
परदेशातून आलेल्या प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यायची आहे, लपवायची नाही. कारण या साथीचीलागण लागण्यासाठी हेच मोठे कारण आहे. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.