HW News Marathi
Covid-19

३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार | मुख्यमंत्री

मुंबई | महाराष्ट्रात ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, तर पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (२८ जून) जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, १ जुलैला लॉकडाऊन उठल असे समजू नका. १ जुलैपासून जिथे गरज आहे, तिथे काळजी घ्या, असे सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, अर्थचक्राला चालणा देताना मिशन बिगन अगेनच्या अंतर्गत अर्थचक्राला चालणा देतानासर्व सुरू करणार तर सहाजिकच राज्यातील रुग्णांच्या संख्येतही वाढ होणार आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. काही जिल्ह्यांमधून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द वापरत नसलो तरी काही बंधने मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील, असे त्यांनी सांगितले

 

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

  • १ जुलैला लॉकडाऊन उठल असे समजू नका. १ जुलैपासून जिथे गरज आहे, तिथे काळजी घ्या
  • शाळा सुरू होणार का?, त्यापेक्षा शिक्षण सुरू होणार, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
  • महाराष्ट्राने १६ हजार कोटी गुंतवणूक करणारे करार केले आहेत. उद्योजकांनो महाराष्ट्रात या आणि गुंतवणूक करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना केले आहे
  • काही जिल्ह्यात मला लॉकडाऊन करण्याची मागणी लोक करत आहेत, तुम्ही गर्दी कराल, तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल
  • भाजी मंडईत होणारी गर्दी ही चिंता जनक
  • पावसाळ्यात नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, पावसाळ्यात रोगराई वाढणार हे उघड आहे
  • खासगी रुग्णालायांनी बंद ठेवू नये
  • यामुळे चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईत सुरू आहे
  • राज्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मिशन बिंगीन अगेन अतंर्गत सर्व हळूहळू सर्व सुरू होणार आहे. तर रुग्णांच्या संख्येत वाढ तर होणारच, अर्थचक्राला चालणा देताना रुग्णांची संख्या वाढणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  • प्लाझ्मा थेरपीचे ९० टक्के रुग्ण बरे होत आहेत. कोरोना मुक्त झालेल्यांनी प्लाझ्मादान करा. कोरोनावर मात केलेल्या लोकांनी रक्तदानाबरोबर प्लाझ्मा दान करणे आता गजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे
  • प्लाझ्मा थेरपीचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत आहे
  • बाप्पाच्या मुर्तीची उंची करण्याचा निर्णय हे स्तुत्य, विसर्जन आणि प्रतिष्ठांपणाची मुरवणून न काढण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली
  • कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवावर मर्यादा घालणे ही एक चळवळ, सर्व गणेश मंडळाने घेतला निर्णय कौतुकास्पद आहे
  • कोणतीही चर्चा न करता दहीहांडीचा सोहळा रद्द केला, सामाजिक भान ठेवऊन दहीहांडी रद्द करण्याचा निर्णय स्तुत्य, असे मुख्यमंत्री म्हणाले.
  • आषाढीला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी जाणार
  • मी आषाढीच्या वारीला जाणार आहे, मी कोरोनातून जगाला बाहेर करण्यासाठी मी साकडे घालणार आहे.
  • कोरोना असतानाही शेतात बोगस बियाणांची तक्रार येणे दुर्दैवी, बोगस बियाणा विकणाऱ्यांना योग्य ती कारवाई करणार आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना फसविले, त्यांच्यावर कारवाई होणार
  • मुंबईत फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू
  • हे सरकार महाराष्ट्राची काळजी घेणारे सरकार आहे
  • आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
  • ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. पण. काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार
  • आपण सध्या कोरोनाच्या कात्रीत सापडलो आहे.
  • १जुलै हा डॉक्टर दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांना मुख्यमत्र्यांनी सलाम केला
  • निसर्ग चक्रीवादळाची भीषणता भयानक होती
  • चक्रीवादाळामुळे आर्थिक नुकसान झाले
  • वादळाच्या ताडाख्यात शासनाने चांगले काम केले आहे.
  • अद्यापही कोरोनाचे संकट टळालेले नाही
  • कोरोना लढत असताना निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातला आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाप्पाच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल !

News Desk

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २०० च्या वर पोहोचली

News Desk

२० लाख कोटी नव्हे हे तर प्रत्यक्षात फक्त १ लाख ८६ हजार ६५० कोटींचे पॅकेज !

News Desk