HW News Marathi
Covid-19

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री अलिबाग दौरा

मुंबई | निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (५ जून) अलिबाग दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री रोरो पॅसेंजर फेरी सेवेच्या माध्यमातून रायगडला जाण्यासाठी निघाले आहे. यानंतर चक्रीवादळाचे नुकसान झालेल्या गावांना रस्ते मार्ग पाहाणी करतील.

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेखही असतील. याशिवाय राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा उद्या (६ जून) रायगड दौरा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत आणि झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

असा आहे मुख्यमंत्र्यांचा अलिबाग दौरा

  • गोल्डन गेटने रो-रो बोटीतुन मांडवा जेटीकडे प्रयाण
  • मांडवा जेटी ता. अलिबाग येथे आगमन
  • मोटारीने थळ ता. अलिबागकडे प्रयाण
  • थळ ता. अलिबाग येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी
  • मोटारीने थळ ता. अलिबाग येथून अलिबागकडे प्रयाण
  • अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथे आगमन
  • अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथील नुकसानीची पाहणी
  • मोटारींने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबागकडे प्रयाण
  • निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक
  • रो- रो बोटीने ॲारेंज गेटकडे प्रयाण
  • ॲारेंज गेट येथे आगमन

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर कोरोनाचे जंतू फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते! शिवसेना आमदाराची जीभ घसरली

News Desk

लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे!

News Desk

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे डॉ.दीपक म्हैसेकरांच्या सूचना

News Desk