HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

नवी दिल्ली | राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेट घेतली आहे. मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी आज (२१ फेब्रुवारी) जावून भेट घेतली असून या दोघांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती मिळली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांची मोदींसोबत भेट झाल्यानंतर ते थोड्याच वेळात पत्रकार परिषदे घेणार आहे. यात  मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या मुद्द्यांबद्दल माध्यमांशी चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री मोदी पाठोपाठ, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची साडेसात वाजता भेट घेणार आहेत.

सोनिया गांधींच्या भेटीदरम्यान सीएए-एनआरसीवर होणार चर्चा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. महाविकास आघीडीतील समन्वय राखण्याासाठी उद्धव ठाकरे सोनिया गांधीची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री हे मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची सायंकाळी ६ वाजता सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीआर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related posts

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

अपर्णा गोतपागर

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत अन् राहतील !

News Desk

Breaking News | रोहित पवार-रविकांत तुपकरांची बंद दाराआड चर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ जागांवर ठाम

News Desk