HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन!

नाशिक। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काही वेळापूर्वी ओझर विमातनळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री नाशकात दाखल

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समवेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचेही आगमन झाले. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, आमदार सरोज आहेर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.

विधानसभेतही युती होणार नाही

यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील युतीवरही भाष्य केलं. युती होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही म्हणले तरी होणार नाही. तुम्ही उद्या म्हणले करा तरी होणार नाही. कारण विधानसभेत कुणी ती जागा घ्यायच्या इथून सुरू आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही युती होत नाही. झाली तर लोकसभेला होईल. तीही त्यांची गरज म्हणून होईल. आपली गरज म्हणून नाही. पण विधानसभेत युती होईल असं वाटत नाही, असं ते जाधव. विधानसभेत युती होणार नाही हे माझं अॅनालिसिस आहे. हे व्यक्तिगत मत आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. इथे काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होत नाही. आपली आणि भाजपची जागेवरून झाली नाही. मग तीन पक्षांची कशी होणार? कोणी कोणी काय घ्यायचं आणि काय द्यायचं?, असा सवालही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना – अशोक चव्हाण 

News Desk

महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

‘पेगासिस’ची चिंता सोडा, ‘पेंग्विनची’ चिंता करा; चित्रा वाघ यांचं राऊतांवर हल्ला

Jui Jadhav