HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा घुमजाव

मुंबई | आपण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार असल्याचे अत्यंत मोठे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, “आपल्याला आदित्य यांना सरकारचा भाग म्हणून पाहायला आवडेल”, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. मात्र, आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. या विधानाबाबत प्रश्न विचारला असता “मी असे कधी म्हणालो ?, कुठे म्हणालो ?”, असा उलट प्रश्न मुख्यमंत्र्यांनीच केला आहे. त्यामुळे, आता याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

“आदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य ठरतील. आम्हाला त्यांना सरकारचा भाग म्हणून पाहायलाही आवडेल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हणाल्याचे वृत्त होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त पूर्णपणे नाकारले असून आपण असे कोणतेही वक्तव्य न केल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून काम करा – अशोक चव्हाण

News Desk

खाम नदीच्या पुनरूज्जीवनातून शहराचा शाश्वत विकास! – आदित्य ठाकरे

Aprna

मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार, मनसेने उडवली खिल्ली

News Desk