HW News Marathi
Covid-19

लहान मुलांचं सप्टेंबरपासून लसीकरण होणार?

नवी दिल्ली | संपूर्ण देश गेली दीड वर्ष कोरोना रोगाशी झुरत आहे. य रोगावर एककंग उपाय तो म्हणजे लसीकरणाचा. कोरोनाची एक लाट ओसरत नाही आहे तोवर तिसऱ्या लाटेची संभावना व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं म्हटलं जात असल्यानं लहान मुलांसाठी लस उपलब्ध होण्याची तीव्र निकड भासत आहे. बालरोग तज्ज्ञ संघटनांसह मुलांशी संबंधित बर्‍याच तज्ज्ञ समूहांनी कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना धोका असण्याचा अंदाज चुकीचाही असून शकतो असं म्हटलं असलं, तरीही आता तिसऱ्या लाटेत कोणताही धोका पत्करण्याची सरकारची तयारी नाही आहे.

लहान मुलांना लवकरात लवकर लस उपलब्ध होणार

तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घटक ठरेल असं म्हटलं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लहान मुलनाच्या लसीकरणेला पाहिला प्राध्यान्य दिलं पाहिजे. याचाच एक भाग म्हणून झायडस कॅडिलाच्या लशीला लवकरच आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सप्टेंबरपासून ही लस देता येऊ शकते, अशी माहिती लस विषयक राष्ट्रीय तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे. झायडस कॅडिलाच्या लसीच्या चाचण्यांचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. तसंच भारत बायोटेकची लहान मुलांसाठीची कोवॅक्सिन लसही लवकरच उपलब्ध होऊ शकते. तिच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून, त्या सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशात १२ ते १८ वर्षे वयातील मुलांचं लसीकरण ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा जानेवारी-फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू होऊ शकते, असं अरोरा यांनी स्पष्ट केलं.

नव्या आरोग्यमंत्र्यांकडून सुविधा पॅकेज तयार

दरम्यान, देशाचे नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी, सरकार आरोग्य क्षेत्रासाठी एक पायाभूत सुविधा पॅकेज तयार करत असल्याचं म्हटलं आहे. ९ महिन्यांत हे पॅकेज लागू केलं जाणार असून, या अंतर्गत देशातील ७३६ जिल्ह्यात बालरोग केंद्रं सुरू केली जातील आणि त्यात मुलांसाठी सुमारे ४ हजार आयसीयू बेड असतील.

गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाचं अतोनात नुकसान होत आहे, त्यामुळे लस लवकर आल्यास मुलांचं लसीकरण करून त्यांना सुरक्षित करता येईल आणि शाळा, महाविद्यालय सुरू करता येतील. मुलांच्या लसीकरणाशी संबधित विविध मुद्द्यांवर गांभिर्याने विचार केला जात असल्याचं अरोरा यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर यशस्वी मात

News Desk

बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्याने महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना मोठे दु:ख !

Gauri Tilekar

‘ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली’

News Desk