HW News Marathi
महाराष्ट्र

“या PI लगडचा बाप कोण आहे, ते आम्ही शोधून काढू”, चित्रा वाघ कडाडल्या 

पुणे | वानवडी पोलिसांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण रफादफा करायेच आहे. त्यासाठीच हे प्रकरण PI लगड याच्यासारख्या रगेल अधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे. मात्र, या PI लगडचा बाप कोण आहे, ते आम्ही शोधून काढू, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांनी लक्ष्य केले आहे. चित्रा वाघ आज (२५ फेब्रुवारी) वानवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. आम्ही इतक्या दिवसांपासून मुंबईतून पूजा चव्हाण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. मात्र, आज प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर तपासाची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले.

वानवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक लगट यांना हे प्रकरण रफादफा करण्यासाठीच बसवले आहे. मी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अत्यंत मग्रुरीने उत्तरे दिली. आपला कोणीतरी बाप वरती बसलाय, कोणी काही बोलले नाही तरी तू काही करायचे नाही, आम्ही काय ते बघतो, अशा एकंदर आविर्भावात PI लगड दिसतात. या लगडला चालवणारा बाप कोण आहे, हे भाजप नक्की शोधून काढेल, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मदत केली. राठोडांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता मी थोड्याच वेळात याबद्दल बोलणार आहे, असं वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. चित्रा वाघ आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण राहात होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले? हे प्रश्न कायम आहेत.

दरम्यान, यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणीदेखील वाघ यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुणे पोलीस दलाल असल्याचे वक्तव्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद! – मुख्यमंत्री

Aprna

मुख्यमंत्री पिंजऱ्यात बसून आहेत, कामच केलं नाही मग सर्टिफिकेट कसं देणार? नारायण राणेंचा प्रहार

News Desk

मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद

swarit