HW News Marathi
महाराष्ट्र

“रडने का नही………भिडने का….”

मुंबई | महिला तहसीलदार ज्योती तिवरे यांची ऑडिओ क्लिपचं प्रकरण सध्या गाजत आहे. भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना ‘रडने का नही, भिडने का’ म्हणत पाठिंबा दिला. तसेच आम्ही सर्व तहसीलदार देवरे यांच्यासोबत असल्याचंही जाहीर केलं. यामुळे वाघ यांनी लंकेंविरोधात दंड थोपटल्याचं बोललं जात आहे.

दोन पावले माघार घेतं नाही, तर 200 पाऊलं पुढे जात ठोकणार

चित्रा वाघ यांनी आमदार निलेश लंकेंना आव्हान दिलं आहे. “ओ लंके, ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. दोन पावले माघार घेतं नाही, तर 200 पाऊलं पुढे जात ठोकणार आहे हे हे ध्यानात ठेवा. आम्ही सगळे ज्योतीताई देवरेच्या मागे सक्षमतेने उभे आहोत,” असं सांगत चित्रा वाघ यांनी निलेश लंके यांना आव्हान दिल आहे.

सत्तेतले हे बेलगाम घोडे

याआधी देखील चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरुन निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केलाय. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की मी ही तुझ्याकडे लवकरच येतेय. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलंय. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हिच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलंय. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण ?

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी अमरावतीचे वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन ऑडिओ क्लिपमध्ये केले आहे. तहसीलदार यांच्या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असुन तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला असल्याचेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी देखील जेव्हा तहसीलदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांना सूचना केल्या. मात्र, त्यावेळी आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री अपरात्री केल्याचेही निलेश लंके यांनी सांगितलं. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला प्रयत्न असल्याचं निलेश लंके स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खाम नदीच्या पुनरूज्जीवनातून शहराचा शाश्वत विकास! – आदित्य ठाकरे

Aprna

“मनसे सोबत गेल्यास भाजपचे मोठे नुकसान होईल”, रामदा़स आठवले

News Desk

“राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, खासदार रक्षा खडसेंचं मुख्यमंत्र्यांऐवजी शरद पवारांना पत्र

News Desk