HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली शपथ

मुंबई। महाराष्ट्राचे १९वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांना काल (५सप्टेंबर) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी राज्यपालांना शपथ दिली. कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलसह आदी नेतेमंडळी शपथविधी सोहळ्याला उपस्थिती होते.

मुख्य सचिव अयोजय मेहता यांनी कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केल. कोश्यारी यांच्या जन्मी जन्म १७ जून १९४२रोजी झाला. त्यांनी उत्तरप्रदेशातील राजा इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. परवत पियूष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी उत्तरांचल प्रदेश क्यू? आणि उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान या दोन पुस्तकांचे लेखन केले.

कोश्यारी हे ३० ऑक्टोबर २००१ ते १ मार्च २००२ या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कामे केली आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

swarit

“किती दिवस तुम्ही शरद पवार साहेबांचा आधार घेणार?”- बाळासाहेब थोरात

News Desk

बिग बींची लोक बिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत

Gauri Tilekar