मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आघाडीवर आहेत. यात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एमडी आणि एमएसच्या परीक्षा ३० जुलैच्या आधी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा स्थगित करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात पत्रात मुख्यमंत्र्यांनी भारत सरकारकडून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला डिसेंबर २०२० पर्यंत परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली, असे म्हटले आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray has written to the Hon’ble PM @narendramodi ji requesting intervention to direct the Medical Council of India to postpone the MD/MS examination till December 2020 as the final year resident doctors are playing a crucial role in fighting this pandemic pic.twitter.com/fur87m2T1Y
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 24, 2020
मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले, “अंतिम वर्षातील एमडी एमएसचे अनेक विद्यार्थी निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका दवाखाने तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड -१९ रुग्णांवर उपचारासाठी तसेच क्लिनिकल व्यवस्थापनास मदत करण्यात आघाडीवर आहेत. जर त्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या तर या अत्यंत महत्त्वाच्या काळात प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता भासेल,”
‘कोविड योद्धा’ असलेल्या निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना मनसे नेते अमित ठाकरे यांनी पत्र लिहिले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधांना पत्र लिहून डिसेंबर 2020 पर्यंत एमडी आणि एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीव अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी भेट घेऊन हा मुद्दा मांडला आणि त्यांच्याशी चर्चा केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.