HW News Marathi
महाराष्ट्र

भांडूप आग प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी मागितली मृतांच्या कुटुंबीयांची माफी, कुटुंबीयांना ५ लाखाची मदत जाहीर

मुंबई | भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईज रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची आर्थिक मदत करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. ते पत्रकारांशी घटनास्थळावरुन संवाद साधत होते.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख

या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यात दिरंगाई, दुर्लक्ष झालं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे आपण मॉल, सेंटर्समधील वर्दळीवर बंधनं आणली असल्याचंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भांडूपमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना संकटामुळे तात्काळ उपचारासाठी राज्यात रुग्णालये आणि कोविड सेंटर उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याली हे मॉलमधलं हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोव्हिड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती. येत्या 31 तारखेला संपत होती. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या दुकान, तळमजल्यांना आग लागली. ती हॉस्पिटलपर्यंत आली.

ज्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते, त्यातील काही जणांचा आतून बाहेर काढताना काहींचा मृत्यू झाला. अशा घटना झाल्यानंतर आपण जागे होतो, चौकशी होते. या प्रकरणातही चौकशी करुन कारवाई करु. कमला मिलमध्येही आग लागली होती. त्यावेळी अनेकांचे प्राण गेले होते. त्यामुळे अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून कोव्हिड सेंटर, जम्बो फॅसिलिटी सेंटरमधील स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोविड सेंटर, रुग्णालये ज्या इमारतीत आहेत, त्या संपूर्ण इमारतीचंच फायर ऑडिट करण्याच्याही सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. या रुग्णालयात काही लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यांचाच या दुर्घटनेत अधिक मृत्यू झाला आहे. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणं किंवा त्याचा निर्णय घेणं कठिण असतं. मात्र, या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयांकडे मी दिलगिरी व्यक्त करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

काय आहे घटना?

भांडूप पश्चिमेकडे असलेल्या ड्रीम मॉलला रात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली होती. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय आहे त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईच्या महापौर घटनास्थळी

भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या २० गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लासलगाव जळीत कांड : पीडितेला उपचारासाठी मुंबईत हलवले

News Desk

निर्बंध लावण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान

News Desk

माझगावमधील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमनदल घटनास्थळी दाखल

swarit