मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२४मे) दुपारी १.३०वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री ठाकरे काय महत्वाची घोषणा करणार याकडे लक्ष लागून आहे. भाजपने मेरा आंगन, मेरा रंणागण, असे आंदोनल करत, राज्य सरकारने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री राज्यासाठी कोणते पॅकेजची घोषणा करणार का?, यावर काही बोलणार का?, असा सर्वांच प्रश्न पडला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दि. २४/०५/२०२० रोजी दुपारी १:३० वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the State at 1:30 pm on 24th May, 2020.#WarAgainstVirus pic.twitter.com/hNDuOserNQ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 24, 2020
मुंबई कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. देशासह राज्यात रमजान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिम बांधवाना काय अवाहन करतील. तसेच सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये नमके काय बोलणे झाले याबद्द देखील मुख्यमंत्री आज बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.