मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ मार्च) मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. कोरोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. उउद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.
“कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही”
कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही. लस घेताना कळत नाहीत. कोरोनाचा धोका परत वाढतो. त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. लसीकरण करुन घ्या. बाहेरचं अनावश्यक जाणं टाळा. आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. नाईलाजाने परत कडक लॉकडाऊन करावा लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शरद पवार यांना कोरोना लस
दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना लसीकरणे केले होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.
Maharashtra CM Uddhav Thackeray takes his first shot of COVID-19 vaccine pic.twitter.com/Muo5A8e831
— ANI (@ANI) March 11, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.