मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या कोस्टल रोडच्या कामामधील एका महत्वाच्या टप्प्याच्या कामाला आज (११ जानेवारी) सुरुवात झाली. कोस्टल रोडच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या अजस्त्र बोरिंग मशिनचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शिनी पार्क येथे करण्यात आला. या मशिनचे ‘मावळा’ असे वैशिष्ट्यपूर्ण नाव ठेवण्यात आले आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.
“मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चाललेली आहे. उपनगरांतून शहरील दोन टोकांना सांधणारा ‘कोस्टल रोड’ हा महामार्ग आहे. हा कोस्टल रोड झाल्यानंतर शहरांमध्ये येणाऱ्या वाहतुकीला थोडासा दिलासा मिळेल. ज्यांना मध्य शहरात जाण्याची आवश्यकता आहे त्यांना थेट शहरात येण्याची सोय यामुळे होणार आहे. हा जो सागरी महामार्ग आहे त्यातील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे त्याची सुरुवात आज झालेली आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा आणि महत्त्वाचा क्षण आहे. २०१२ पूर्वीच आपण या समुद्री मार्गाची संकल्पना माडंली होती. वांद्रे-वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती. मुंबईला सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या या क्षितीजावर समुद्री मार्गही शोभून दिसणारा आहे. यासाठी आपण अप्रतिम असे नियोजन केले होते. कामही धुमधडाक्यात सुरु केले होते. मध्येच कोरोनाचे संकट आले, अजूनही ते गेलेले नाही. तरीही अनेक गोष्टी ठप्प झाल्या असतानाही, या कोस्टल रोडचे काम मंदावू दिलेले नाही. कोणतेही काम पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही, त्यासाठी लढवय्या मावळ्यांची गरज असते. तसे या कामामध्ये ‘मावळा’ या यंत्राचे काम असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
नेमके काय आहे मावळा मशीन ?
बोगदा खणणारं मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचं साधन आहे. या मशीन १२.१९ मीटर व्यासची आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचा टीबीएम मशीन आहे. बोगद्याचा तयार केलेला व्यास ११ मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या मार्गावर समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा हे मशीन आणलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.