HW News Marathi
Covid-19

मी जेव्हा पुन्हा ठाण्यात येईन तेव्हा ठाणे कोरोनामुक्त झालेले मला नक्कीच आवडेल – मुख्यमंत्री

ठाणे | मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे महानगरपालिका सभागृह येथे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.कोरोना दक्षता समिती प्रत्येक वॉर्डात स्थापन करावी तसेच जगजागृती मोहिम सुरु ठेवावी. अनलॉक करताना सुरक्षेचे नियम व मास्क वापरणे तसेच हात धुवत राहणे हेच अनलॉकवर औषध आहे. कंटेनमेंट झोन तसेच ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. शासन आपल्या पाठीशी खंबिरपणे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी महापालिका आयुक्तांनी सुरवातील कोरोना बाबत कशा बाबत उपाय योजना केल्या, कोविड केअर सेंटरचा कसा फायदा झाला या विषयीचे सादरीकरण केले. त्यानंतर मुंब्रा पॅटर्न कसा यशस्वी केला या बाबत मुख्यमंत्र्यांनी सवाल केला असता, त्या ठिकाणी कशा पध्दतीने उपाय योजना केल्या. रुग्णांचा शोध कशा पध्दतीने घेतला गेला, या विषयीची माहिती सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांनी त्यांना दिली. ठाण्यात आल्यानंतर समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रार्दुभाव रोखण्यात ठाण्याने यश मिळविले आहे. त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु गाफील राहू नका, सणांचे दिवस आहे. परंतु, प्रादुर्भाव वाढू शकतो, आपल्याला थांबायचे नाही, कोरोना विरुध्दचा हा लढा सुरुच ठेवायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा मी जेव्हा ठाण्यात येईन तेव्हा ठाणे कोरोनामुक्त झालेले मला नक्कीच आवडेल, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात १३ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन, लवकरच नियमावली जारी करणार

News Desk

११ लाख ९० हजार कामगारांची ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी

News Desk

सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी

News Desk