HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांनी फोन करून मुरलीधर मोहोळ यांची केली विचारपूस

पुणे | पुण्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले तसेच त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झालेले पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला. मोहोळ यांच्या प्रकृतीची उद्धव ठाकरे यांनी विचारपूस करण्यासाठी त्यांनी फोन केला होता.

काळजी घेऊन लवकर बरे होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. फील्डवर काम करत असल्याबद्दल कौतुक केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असले, तरी कोरोनाच्या संकटकाळात राजकीय चेहऱ्यापलिकडे असलेल्या माणुसकीचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घडवल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नगरसेवक असलेले मोहोळ थेट मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे हरखून गेले.

मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी (4 जुलै) सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावली होती. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापौरांवर मोठी जबाबदारी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला आर्थिक पॅकेजची गरज, यूपीए सरकारच्या काळातील योजना चांगल्या !

News Desk

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, ते आम्हाला कायमच प्रिय !

News Desk

कोरोना लसीचं सत्य तर जाणून घ्या, पुनावालांनी पत्रक जाहीर करत मांडली बाजू

News Desk