HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:च गाडी चालवत पंढरपुरात दाखल होणार

सोलापूर | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक वेळा आपलीच गाडी स्वत: चालवताना दिसले आहेत. आषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पुजेलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरेंसह जाणार आहेत. आज (१९ जुलै) ते जाणार असून कोरोनामुळे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुरात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सपत्नीक मुंबईहून वाहनाने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. उद्या मंगळवारी आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरातील मंदिरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी ते उपस्थित राहणार आहेत.

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. . ८ ते ९ तास गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रात्री सात ते आठच्या सुमारास पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे.

कोरोनामुळे ड्रायव्हर शिवाय प्रवास

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगची सक्ती सुरू आहे. प्रवासातही ठराविक प्रवाशांच मूभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या सुरूवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतःच गाडी चालवत मंत्रालय आणि इतर भेटींच्या ठिकाणी जाताना दिसून आलं. मंत्रालयात होणाऱ्या बैठकांनाही मुख्यमंत्री स्वतःच गाडी चालवत हजर राहतात. मे मध्ये आमदारकीची शपथ घेतली. त्यावेळी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळीही ते स्वतः गाडी चालवत असल्याचं बघायला मिळालं होतं. मागील वर्षीही मुख्यमंत्री हे स्वत- गाडी चालवित पंढरपुरात दाखल झाले होते.

मोठा पोलिस बंदोबस्त असणार

मुख्यमंत्र्यांना महापूजेला भाजपसह विविध वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर समितीने आषाढीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात संत कान्होपात्रा समाधी जवळ तरटीच्या रोपाची लागवड केली जाणार असल्याचे ही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर महाराज जळगाकर आदी उपस्थित होते.

काय म्हणाले होते तुषार भोसले?

औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला होता.

उद्धव ठाकरे- अजितदादा आता परिणाम भोगायला तयार रहा

तुषार भोसले यांनी शिवसेनेसा देखील लक्ष्य केलं. बंडातात्यांच्या अटकेनंतर शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. तर सरकारला इशारा देताना उद्धवजी आणि अजित पवार आता परिणाम भोगायला तयार रहा, असं ते म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाविकासआघाडीचं लवकरच विसर्जन होणार” म्हणणाऱ्या आठवले-राणेंवर फडणवीस संतापले !  

News Desk

देशातील ‘या’ ६ कोविड संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक

News Desk

कोरोना रुग्णांवर ‘बीसीजी लसी’ची चाचणी करण्यास परवानगी, पुण्यातील ससून रुग्णालयात होणार चाचणी

News Desk