HW News Marathi
महाराष्ट्र

“…असंच राहीलं तर आम्ही दरवर्षी तुम्हाला भेटत राहणार,” मु्ख्यमंत्र्याचं कोल्हापुरातील गावकऱ्यांना आवाहन

कोल्हापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली. दरम्यान शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान मुख्यमंत्री आल्याने गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे पोलिसांनी गर्दी आवरणं कठीण झालं होतं. गावकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी सर्वांनी एकत्र येऊन पुनर्वसनासाठी विनंती करा असं आवाहन केलं आहे.

निवारा केंद्रातील महिलांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, आम्ही ती मागणी मंजूर करु असं आश्वासन दिलं आहे. अन्यथा दरवेळी पाऊस येणार आणि आम्ही तुम्हाला भेटत राहणार असंच सुरु राहील. तुम्हाला पूर आल्यावर दरवेळी निवारा केंद्रात यावं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना अद्यापही कोरोनाचं संकट आहे अशी आठवण करुन देताना मास्क लावायला विसरु नका असं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंचे वंशज आहेत, ढाण्या वाघ आहे तो महाराष्ट्राचा. आम्ही आवाज दिल्यावर ते थांबले, त्यांनी आमचं ऐकून घेतलं. मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे, असं इथल्या नागरिकाने सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन योग्य मदत द्यावी, जाहीर केलेली तुटपुंजी दहा हजारांची मदत ही स्वच्छता आणि जेवणखाण्याला पुरेल ही मदत वाढवावी अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.

दौरा झाला होता रद्द!

तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २६ जुलै रोजी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दौरा करणार होते. रायगडमधील तळीये आणि चिपळूणची पाहणी केल्यानंतर ते सातारा, कोल्हापूरची हवाई पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर साताऱ्यात न उतरता पुण्याला माघारी गेलं होतं. कोल्हापूरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे आत्तापर्यंत २१३ जणांचा बळी घडल्याची माहिती स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आणि डिजास्टर मॅनेजमेंट विभागाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्या लोकांनी कंगनाची बाजू घेतली त्यांचे तोंड काळे करुन कंगना गेली – प्रताप सरनाईक 

News Desk

विधानसभा अध्यक्षपद घ्यायला मी तयारं ! पण…शिवसेनेचे भास्कर जाधव काय म्हणाले ?

News Desk

कृष्णा कारखाना निवडणूक, शरद पवार-पृथ्वीराज चव्हाण भेटीने पुन्हा चर्चेला उधाण

News Desk