HW News Marathi
महाराष्ट्र

‘यंदाही मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या विठूरायाची पुजा करण्याचा मान, विणेकऱ्यांना’

पंढरपूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली २ वर्ष धार्मिक स्थळे बंद आहेत. अशात आषाढी वारीला सुरुवात झाली असून कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नाकारली आहे. इतकंच नाही तर आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा सुद्धा रद्द करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांसोबत विणेकऱ्यांना पूजेचा मान मिळाला होता. यावर्षी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत विठ्ठल मंदिरातील विणेकरी यांना उपस्थितीत राहण्याचा मान मिळणार आहे अशी माहिती पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

मंदिरातील विणेकऱ्यांमधूनच मानाचा वारकरी निवडला जात आहे

यापूर्वी आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी रांगेत उभारलेल्या भाविकांमधून वारकरी दाम्पत्याची निवड केली जाते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या महापूजेला उपस्थित राहण्यासाठी मानाचा वारकरी म्हणून त्या दाम्पत्याकडून पूजा केली जाते, अशी प्रथा वर्षांनुवर्षे चालत आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही परंपरा बंद आहे. त्याऐवजी विठ्ठल मंदिरातील विण्याची सेवा करणारे किंवा विणा घेऊन उभे असणाऱ्या सेवेकऱ्यांमधून मानाचा वारकरी निवडला जातो.

उद्धव ठाकरे सहपरिवार पूजेसाठी हजर

गेल्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात प्रार्थना करण्यासाठी दाखल झाले होते. कोरोनाचं संकट अद्यापही तळलेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यंदाही आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. या वर्षी सुद्धा उद्धव ठाकरे सह कुटुंब महापूजेस उपस्थित राहतात की नाही हे बघायचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत परळीच्या सावळाराम मंदिरात ‘श्रीराम’ जन्मोत्सव

Aprna

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट

News Desk

राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार, मनसेची आक्रमक भूमिका 

News Desk