HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, राज्यातील पहिली युती जाहीर!

पालघर। जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. राज्यातील सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते म्हणजे मनसे आणि भाजपची युती होणार की नाही याकडे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना जोर आला आहे. त्यातच आज पुण्यात मनसे नेत्यांनी भाजपसोबत युतीची जाहीर मागणी केली आहे. असं असताना राज्यातील पहिली मनसे आणि भाजपची अखेर पालघरमध्ये झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.

युतीबाबतच्या चर्चांना बळ आलं

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दोन महिन्यापूर्वी नाशिकमध्ये भेट झाली होती. त्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील घरी जाऊनही भेट घेतली. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीबाबतच्या चर्चांना बळ आलं. चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी मान्य केलं मात्र, आगामी निवडणुकीबाबत युतीसाठी कसलाही प्रस्ताव दिला नसल्याचंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं होतं.

आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी मतांनी विजयी झालेले उमेदवार

News Desk

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो” – मुख्यमंत्री

News Desk

राज ठाकरेंच्या उपस्थितीत हर्षवर्धन जाधवांचा मनसेत प्रवेश

swarit