HW News Marathi
महाराष्ट्र

खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे नगरसेवक मनिष आनंद यांच्यासह ७ जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न,विनयभंगाच्या कलमान्वये FIR दाखल

पुणे | पुण्याच्या औंध परिसरात काही दिवसांपूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गाडीने अपघात झाल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून हर्षवर्धन जाधव यांनी मारहाण केली म्हणून त्यांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता न्यायालयाच्या आदेशाने खडकी कॉन्टॅमेंट बोर्डाचे नगरसेवक मनीष आनंद यांच्यासह 7 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा व विनयभंग आणि इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या सोबत असणाऱ्या 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, मजय चड्डा, मनीष आनंद, मोटारसायकलवर असलेले दोन अनोळखी व्यक्ती व गर्दीत असणारा एक अशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचे पुढारपण ऑनर किलिंगच्या वाढत्या धब्ब्यांनी काळवंडले जात आहे का?

News Desk

शहीद पोलीस अधिकाऱ्यांना संपत्ती दाखवण्याची नोटीस

swarit

कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या! – अजित पवार

Aprna