HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC Exam |  आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे | MPSC ची परीक्षा जी १४ मार्चला होणार होती ती पुढे ढकलल्यामुळे काल (११ मार्च) पुण्यात विद्यार्थ्यांनी गोंधळ केला होता, रस्त्यावर आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी तसंच गर्दी केल्याप्रकरणी पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झालेत. गुरुवारी पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी एन्ट्री घेतली होती. त्यांच्या एन्ट्रीने आंदोलनाला आणखीनच धार आली होती. तसंच त्यांनी आक्रमक भूमिका थेट राज्य सरकारवर सडकून प्रहार केले होते.

पडळकरांविरोधात गुन्ह्याची नोंद

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी न जमवण्याचं आवाहन पोलिस आणि प्रशासन करत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. याच पार्श्वभूमीवर कलम १८८ नुसार पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

गोपीचंद पडळकर यांच्यामुळे आंदोलन विद्यार्थ्यांनाही चांगलेच स्फुरण चढले आहे. गोपीचंद पडळकर रस्त्यावर आडवे पडून सरकारविरोधात घोषणबाजी करत आहेत. जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. तसंच रात्रीचा मुक्कामही मी रोडवरच करणार असल्याचा त्यांनी बोलून दाखवलं मात्र त्या आधीच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Aprna

’19 दिवसात दिले तब्बल 10 कोटी डोस’, देशात लसीकरण वेगाने!

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ED ने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

Aprna