HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात २०१९ च्या जूनपर्यंत ३०,००० किमी ग्रामीण मार्गांची पूर्तता | फडणवीस

नागपूर | ‘सरकारने पुढील वर्षी जूनपर्यंत ३०,००० किलोमीटर ग्रामीण मार्ग पूर्ण करण्याची योजना आखली आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले आहे. नागपूर येथे आयोजित इंडियन रोड कॉंग्रेसच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत हे रस्ते बनविले जात आहेत. ३०,००० किलोमीटर पैकी १०,००० किलोमीटर ग्रामीण मार्ग आधीच पूर्ण केलेले आहेत. “एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) रस्त्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले असून, या (ग्रामीण) रस्त्यांना ९५.५ टक्के ग्रेडिंग दिली आहे, जे राज्यासाठी चांगले आहे,” असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी असा दावा केला आहे की, ‘हा जगातील सर्वात सोपा आणि देशभरातील सर्वात मोठा महामार्ग आहे. ४९,२५० कोटी रुपये खर्चून बांधणार आहेत.’ नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा ७०० किलोमीटर लांब असेल आणि ११ जिल्ह्यांत पसरलेल्या ३९२ गावांतून पार पडेल. या महामार्गासह २२ स्मार्ट शहर बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत ज्यामुळे आर्थिकवाढीस मोठी वाढ होईल. शिवाय, हा महामार्ग २४ जिल्ह्यांजवळून जाणार असून मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टला जोडेल, असे फडणवीस म्हणाले.

मुंबई महानगर आणि शेजारील नवी मुंबई दरम्यान २२ किलोमीटर लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)चे काम सुरू झाले असून तो देशातील सर्वात मोठा समुद्र पुल असेल. असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी Deutsche Bank च्या एका अहवालाचा दाखला देत असे सांगितले की, सध्या देशातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी ५१ टक्के पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील तिघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, फडणवीसांची टीका

News Desk

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार! – डॉ. जितेंद्र आव्हाड

Aprna

पालघर मॉब लिंचींग प्रकरणी १५४ जणांना अटक, पुढील कारवाई कोर्टात होणार – गृहमंत्री

News Desk