HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

मुंबई । मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणानंतर आता धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला देखील अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत या मागणीसह धनगर आरक्षण समन्वय समितीच्या ९ ऑगस्टपासून राज्यातील ९ आंदोलकांनी उपोषण सुरू केले. मात्र, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी यापैकी काही आंदोलकांची प्रकृती ढासळली. आज (१३ ऑगस्ट) या आंदोलनाचा पाचवा दिवस असून ४ जणांची प्रकृती ढासळल्याने येथील पोलिसांनी या आंदोलकांना अखेर बळजबरीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, त्यांपैकी काही आंदोलकांनी उपचारासाठी नकार दिला आहे.

9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवसापासून येथील आंदोलकांची प्रकृती बिघडू लागली आहे. दरम्यान, पोलिसांकडून बळजबरीने जरी या आंदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असले तरीही संतप्त आंदोलक उपचार करून घेण्यास नकार देत आहेत. राज्यात निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापुरातील हे आंदोलन शांतपणे केले जात आहे. मात्र, जिल्ह्यांतील परिस्थिती स्थिर झाल्यानंतर धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

Related posts

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

News Desk

‘व्हॅलेंटाईन डे’ला राहुल गांधींना मिळाले ‘असे’ प्रेमाचे गिफ्ट

News Desk

उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेची तात्काळ मतमोजणीचे आदेश

News Desk