HW News Marathi
Covid-19

कोल्हापूरात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण!

कोल्हापूर | कोल्हापूरात लोकप्रतिनिधी आणि आमदारांना कोरोनाची लागण होण्याने प्रमाण वाढताना दिसत आहे. कोल्हापुरातील उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती.

“माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी,” अशी विनंती चंद्रकांत जाधव यांनी स्वत: पोस्ट करत केली आहे.

https://www.facebook.com/114822716577864/posts/358460268880773/

 

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जाधव हे या दोघांच्याही संपर्कात आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव अशा ३ आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यत पोहचल्याने चिंता वाढली आहे. तसेच, कोल्हापूरात सामान्य लोकांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन

News Desk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण 

News Desk

राज्यात आतापर्यंत तब्बल १३ लाखांहूनही अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk