HW News Marathi
Covid-19

इंधन दरवाढीविरोधात राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी होणार काँग्रेसचे आंदोलन

मुंबई । मोदी सरकारच्या अन्यायी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारी म्हणजेच ७ जून रोजी काँग्रेस हे राज्यव्यापी आंदोलन करणार असलाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज (६ जून) दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत.या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत, याच्याच निषेधार्थ काँग्रेसचे हे राज्यव्यापी आंदोलन असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. यासंदर्भात अधिक बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या या दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यभर एकाचवेळी १ हजार ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ३ पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले आहे.

नाना पटोले यावेळी असेही म्हणाले की, केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे”, असेही नाना पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंतेत मोठी भर ! राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आज ३१ हजारांच्या पार

News Desk

भारतीयांच्या चिंतेत वाढ! गेल्या २४ तासांत देशातील कोरोना संख्या १ लाखांवर

Aprna

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून उद्यापासून नवी नियमावली जाहीर

News Desk