HW News Marathi
महाराष्ट्र

“आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?”, काँग्रेसचा सायकलवरून विधानभवनात प्रवेश

मुंबई | देशात सध्या पेट्रोलचे भाव आकाशाला भिडले आहेत. सामान्य लोकांच्या खिशाला न परवडणाऱ्या टप्प्यात आता पेट्रोलचे भाव गेले आहेत. याच मुद्द्यावरुन काँग्रेसने आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनात सायकलने येत केंद्र सरकारचा निषेध केला.

‘अक्कड बक्कड बंबे बो, ८०, ९० पुरे १००’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते. त्यावर, ‘अक्कड बक्कड बंबे बो, ८०, ९० पुरे १००’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असा मजकूर लिहिलेला होता.

यावेळी काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर सायकलवरून विधानभवनाच्या दिशेने प्रवास सुरू केला. यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते

मोदींनी शेतकऱ्यांना खोटी स्वप्ने दाखवली

यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. इंधन दरवाढीचा विरोध करत मोदी सरकार सत्तेत आले. पण याच सरकारने सर्वात जास्त इंधन दरवाढ करून देशातील जनतेची थट्टा केली. मोदी सरकारने शेतकऱ्यांना खोटी स्वप्नही दाखवली, अशी टीका नाना पटोले यांनी केली. महागाईने सर्व सामान्यांचं जगणं मुश्किल झालेलं असताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी थंडीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याचा दावा केला आहे. खरे तर ही शेतकऱ्यांची थट्टाच आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शनी लागलाय”, व्हिडिओद्वारे रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Aprna

पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात बैठक संपन्न, सकारात्मक चर्चा झाल्याची सर्वच नेत्यांची माहिती

News Desk

उठसूठ शरद पवारांवर बोलणार्‍या गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीने घेतला समाचार

Manasi Devkar