HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे दिग्गज नेते चंद्रकांत रघुवंशी, संजय देवतळे यांच्या हाती शिवबंधन

मुंबई | विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना देखील काँग्रेसमध्ये गळती सुरूच आहे. नंदुरबारचे काँग्रेस आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि चंद्रपूरचे काँग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधले.

सलग चारदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकी आणि मंत्रिपद भोगलेल्या संजय देवतळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे ऐन वेळी संजय देवतळे यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र २०१९ ला युतीमुळे वरोरा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवतळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान, काँग्रेसला नंदुरबारमध्ये देखील धक्का बसला आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत सेनेत प्रवेश केला आहे. चंद्रकांत रघुवंशी काँग्रेसचे विधानपरिषदेचे तीन वेळा आमदार होते. रघुवंशी यांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. त्यांनी १९९२ ते १९९८ असे सहा वर्ष धुळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मिशा काय, भुवया पण काढून टाकेन”, उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंना आव्हान

Aprna

सरकारचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती; संजय राऊतांनी पुन्हा भाजपला डिवचलं

News Desk

तासगाव ढवळी येथे बेकायदेशीर वाळू साठा जप्त

swarit