उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत. उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी यांनी पक्षातली नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. युपी विधानसभेसाठी काँग्रेसने राज्यात १२ हजार किलोमीटरची यात्रा काढण्याचा संकल्प केला आहे. ही यात्रा राज्यातील गावोगावी जाणार आहे. यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महिलांविरोधी हिंसाचार, बेरोजगारी, कोलमडलेली आरोग्यसेवा इत्यादी मुद्द्यांवर काम केले जाणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काम वाढवण्यात आले आहे.
We will be fighting the upcoming Assembly elections under the leadership of Priyanka Gandhi Vadra. She is working hard to ensure that we win. Later on, she may announce the CM's face: Former Union Minister & Congress leader Salman Khurshid on Congress' CM face in UP polls (12.09) pic.twitter.com/ZtPDtV2MH8
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 13, 2021
विधानसभा निवडणूक प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली
“आम्ही प्रियांका गांधी यांना लवकरच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकतो”, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे. खुर्शीद म्हणाले की, “आम्ही २०२२ ची युपी विधानसभा निवडणूक प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. प्रियांका गांधी इथे काँग्रेसच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. त्याचसोबत पुढे आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकतो.” दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी एक प्रोमो प्रसिद्ध केला आहे. ज्यात प्रियांका गांधी यांचा उल्लेख ‘उत्तर प्रदेशची आशा’ असा केला गेला आहे.
विधानसभा निवडणुकीत युती करण्याचे संकेत नाहीत
महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एकत्र येणार कि नाही यावर सगळ्यांचं लक्ष होतं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्यावरील पहिला प्रोमो देखील प्रसिद्ध केला आहे. यामध्ये प्रियंका गांधी यांचं वर्णन ‘उत्तर प्रदेशची आशा’ असं करण्यात आलं आहे. दरम्यान, काँग्रेसने इथे अद्याप कोणत्याही मोठ्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत युती करण्याचे संकेत दिलेले नाहीत. मात्र, या निवडणुकीकरिता काँग्रेस एका छोट्या पक्षाशी हातमिळवणी करणार असल्याची शक्यता आहे.
शिवसेना १०० जागा लढवणार
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कालपर्यंत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु २४ तासांत पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ४०३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी केवळ १०० जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.