HW News Marathi
Covid-19

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली, पुण्याहून मुंबईला हलवण्यात येणार

मुंबई । देशातील कोरोनस्थिती चिंताजनक आहे. राज्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाच्या ह्या विळख्यातून कोणीही सुटत नसल्याचे चित्र आहे. यांकज पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त असून त्यांना आता पुण्याहून मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राजीव सातव यांचा कोरोना रिपोर्ट काहीच दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, २ दिवसांपासून सातव यांची प्रकृती खालावली आहे.खरंतर पुण्यात मुंबईतील लीलावती हॉस्पिटलची एक टीम राजीव सातव यांच्यावर उपचारासाठी करण्यासाठी पोहोचली होती. मात्र, प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने सातव यांना आता मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे, सध्या सातव यांच्या प्रकृतीविषयक सर्व बाबींकडे राहुल गांधी स्वतः लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष परिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरे UGC च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात…

News Desk

नव्या वर्षाचं नागरिकांना गिफ्ट,  WHOकडून  फायझरच्या लसीला मान्यता

News Desk

निलेश लंकेच्या कोविड सेंटरला थेट परदेशातून मिळाली मदत!

News Desk