HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे आज (१० एप्रिल) पहाटे मुंबईत निधन झाले. काही दिवसांपूर्वीच रावसाहेब अंतारपूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ दिवसांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात त्यांना हृदयविकाराचा एक झटकाही येऊन गेला होता. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहेत.

 

रावसाहेब अंतपूरकर यांची माहिती

सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. देगलुर तालुक्यातील अंतापूर येथील रावसाहेब अंतापूरकर यांचे १०वी पर्यंतचे शिक्षण देगलुर मानव्य विकास शाळेत झाले. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.

दरम्यान, राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. २००९ मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर २०१९ मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेला अटक

News Desk

“मोठ्या कडून नाही पण धाकट्या कडून अपेक्षा आहेत..” , तेजस ठाकरेंच्या प्रवेशावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

News Desk

शरद पवारांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बळीचा बकरा करू नका – आठवले

News Desk