HW News Marathi
महाराष्ट्र

लवकरच बनावट सोशल अकाउंट्सचा खुलासा करू, ज्याला भाजपच्या IT विभागाने बनवले आहे – सचिन सावंत

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल ८० हजार बनावट अकाऊंट्स उघडण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखलही करण्यात आले आहेत. कॉंग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मुंबई पोलिसांच्या या निर्णयाचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी स्वागत केले असून लवकरच या SM रॅकेटचा छडा लावला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.”सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सोशल मिडिया रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. लवकरच या बनावट सोशल अकाउंट्सचा खुलासा करू, ज्याला भाजपच्या IT विभागाने बनवले आहे. ज्यांचा उद्देश हा महाराष्ट्राला बदनाम करणे होता.” असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही पुरावा नाही

News Desk

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता! – जयंत पाटील

Aprna

शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न जीएसटीपेक्षा कमी महत्वाचा आहे का? विखे पाटील

News Desk