HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर कोल्हापूरला मिळाले ‘हे’ नवे पालकमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकतेच राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. ठाकरे सरकारने राज्यातील ३६ जिल्ह्यासाठी ३६ पालकमंत्र्यांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पद दिल्यामुळे ते नाराज होते. बाळासाहेब थोरात हे कोल्हापूरच्या मंत्रीपदाच पदभार स्वीकारण्यास तयार नव्हते. यामुळे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाराज बाळासाहेब थोरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री पदसाठी आग्रही होते. एका वृत्तवाहिनीला मुश्रीफ म्हणाले की, सतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर मी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास तयार असल्याचे ते म्हटले होते. तसेच सतेज पाटील यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. मात्र, या नियुक्तीवर सतेज पाटील हे देखील नाराज होते. त्यामुळे, काँग्रेस नेत्यांनाही या नियुक्तींमध्ये बदल हवा होता. यानंतर अखेर कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर, अहमदनगरचे पालकमंत्री पदभार हसन मुश्रिफ यांच्याकडे आहे. आता, विश्वजीत कदम यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. या निर्णयामुळे काँग्रेसचे ११ ऐवजी १२ मंत्र्यांकडे पालकमंत्र्यांची जबाबदारी आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांनी सव्वा रुपयांची किंमत वाढवावी, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर!

News Desk

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला घातला पाच लाखांना गंडा!

Aprna

…तर १ ऑगस्टला होणार जेल भरो आंदोलन

News Desk