मुंबई | काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कालीदास कोळंबकर भाजप-शिवसेनेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र कोळंबकर यांच्या प्रवेशावर प्रश्न चिन्ह होते. आता मात्र कोळंबकर भाजपमध्ये प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. कोळंबकर ३१ जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Congress Maharashtra MLA, Kalidas Kolambkar resigns from the party and the post of MLA. He will join BJP on 31st July. (file pic) pic.twitter.com/cepJXQ0zek
— ANI (@ANI) July 29, 2019
कोळंबकर यांनी त्यांच्या काँग्रेसच्या पदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविला आहे. यापूर्वी कोळंबकर यांनी त्यांच्या वडाळा कार्यालयाच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आले होते. कोळंबकर यांनी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला देखील ते उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.