HW News Marathi
महाराष्ट्र

नोकरशहा महाविकसआघाडीत भांडणे लावत आहेत | अशोक चव्हाण

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील महाविकासआघाडीतील अंतर्गत धुसपूस आता बाहेर पडत आहे. “नोकरशहा महाविकसाआघाडीत भांडणे लावत आहेत,” असा आरोप राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना केला आहे. अशोक चव्हाण यांच्या आरोपामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “महाविकासआघाडीतील मंत्र्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गट दरी निर्माण करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली असून हे सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून काही वादचे मुद्दे असल्याचे त्यांनी सूचीत केले आहे. लोकशाही आणि सरकारी कामकाज यासंदर्भातील नियम अत्यंत स्पष्ट आहेत. अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे पालन करावे,” असे ते म्हणाले.

याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महविकासआघाडीत निर्णय प्रक्रियते सहभागी करू घेत नसल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचा मोठा हात आहे. आणि काँग्रेसने साथ दिल्यानंतर राज्यात महविकासआघाडीचे सरकार आले असून काँग्रेस कमकुवत आहे असे नाही. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस मंत्र्यांचे ऐकले जात नाही. तिन्ही पक्षाचे मिळून हे सरकार बनले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चित काँग्रेसचे जे म्हणणे आणि मुद्दे असतील ते ऐकून त्यावर तोडगा काढतील,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

“विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांची बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेस त्यांचा एक उमेदवार मागे घेतला होता. राज्यात आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कोट्यातील १२ जागांमध्ये प्रत्येक पक्षाला समसमान जागा मिळायला हव्यात, पण आता राष्ट्रवादी-शिवसेना विधानसभेतील जागांनुसार वाटप करण्याचे योजत असून हे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण होते,” असे अशोक चव्हाण मुलाखती म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटील-अमित शहांची दिल्लीत भेट, बीएमसी निवडणुकीबाबत चर्चा – सूत्र

News Desk

देशमुख तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचं हार टाकून स्वागत करायचं का? भाजपची टीका!

News Desk

रत्नागिरी अन् वाशीममध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ही, दिल्लीच्या मरकजमध्ये होते सहभागी

swarit