HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचा आज हाथरस घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह!

नवी दिल्ली | उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे मुलीवर सामुहिक बलात्कार झाला आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व जण पुढे आले. कॉंग्रेसने पीडीतेच्या कुटुंबीयांना भेटण्याचा केलेला पहिला प्रयत्न अयशस्वी झाला मात्र दुसऱ्या प्रयत्नाअंती कॉंग्रेस नेते राहून गांधी आणि प्रियांका गांधी यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, तिच्यावर झालेल्या बलात्काराचा आणि अमानुष हत्येचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आज (५ ऑक्टोबर) सर्व राज्यांमध्ये जिल्हापातळीवर सत्याग्रह करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस व खा. के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. तसेच, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही याबद्दल माहिती दिली आहे.

वेणुगोपाल यांनी पत्रातून आरोप केला आहे की, उत्तरप्रदेशच्या सरकारने हे प्रकरण अतिशय बेजबाबदारपणे हाताळले. त्या मुलीला जिवंतपणी योग्य उपचार – मदत केली नाही. मृत्यूनंतर तिच्यावर कुटुंबाच्या संमतीशिवाय, अंत्यविधीचे संकेत गुंडाळून रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. १ ऑक्टोबरला काँग्रेसचे नेते राहुल आणि प्रियंका गांधी हे पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी जात होते. त्यावेळी त्यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अडवले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी शिष्यवृत्ती बाबतचा मार्चमधील निर्णय ऑगस्टमध्ये रद्द करणे अन्यायकारक – छगन भुजबळ

Manasi Devkar

सांगा पालकमंत्री गेले कुणीकडे? राम कदमांचा सरकारला सवाल

News Desk

सिंधूने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये टोकियोत केली कांस्यपदकाची विक्रमी कामगिरी!

News Desk