HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार ! नाना पटोले

मुंबई । काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसकडून हा दिवस राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची माहिती देखील यावेळी नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले यावेळी म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुलजींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन राहुलजींचा वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत तर पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत. युवक काँग्रेस/एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील. देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना आरजी किटचे वाटप…

राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेसच्यावतीने आज गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असलेल्या ‘आरजी किट’ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारला ‘ऑपरेशन लोटस’चा धोका

News Desk

“चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का?”, शेतकरी आंदोलनावर प्रकाश जावडेकरांची प्रतिक्रिया 

News Desk

…म्हणून २ हजारच्या नोटांची छपाई बंद

News Desk