HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने आग लावण्याचे धंदे बंद करावेत, कॉंग्रेसचा इशारा!

पुणे | कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज (२८ ऑक्टोबर) पुण्यात मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मराठा आरक्षमाच्या विषयावर न्यायालयाची लढाई सुरु आहे. त्यात राज्य सरकार प्रत्येक पावलावर प्रयत्न करत आहे, असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी लढा दिला जात आहे. मात्र, भाजपकडून त्याचा अपप्रचार होत असल्याची टिका सचिन सावंत यांनी भाजपवर थेट केली आहे.

तसेच, सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्रावरही निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्राची भूमिका का मांडली जात नाही आहे? जाणिवपुर्वक हा प्रश्न अनुत्तरीत ठेवला जात आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मोदी सरकार अनुकूल नाही, असेही सावंत म्हणाले आहेत.

तर, राज्यातील प्रत्येक पक्षाने एकत्र येत एकदिलाने आरक्षणासाठी लढा देणे गरजेचे आहे. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यांवर फडणवीसांनी आम्हाला विश्वासात घेतले नव्हते. आम्ही मात्र त्यांना बैठकीला बोलावले. आणि दुर्दैव असं आहे की भाजपमध्ये जे मराठा समाजाचे नेते आहेत ते समाजापेक्षा भाजपचे आहेत, असा आरोपही यावेळी सचिन सावंत यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : भाजपकडून तावडे, मेहतासह पुरोहित यांना घरचा रस्ता

News Desk

शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Aprna

जितेंद्र आव्हाड यांनी ‘या’ कारणामुळे स्वत:ला केले क्वारंटाइन

News Desk