HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही!

वर्धा | लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केली आहे. तर इतर ५ जणांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. वर्ध्यात काल (१४ जुलै) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदी निवडीवरून काँग्रेसवर टीका केली.

वर्धा येथील सेलूमधील नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन आणि वर्ध्यात नवीन बसस्थानकाचं लोकार्पण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “काँग्रेसचे इंजिन खराब झाले आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही.”

मुनगंटीवार पुढे असे देखील म्हणाले की, काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची कितीही स्वप्न बघितली, तरी त्यांच हेकाही क्षणच त्यांना आनंद देऊ शकते. गेल्या ४७ वर्षांत काँग्रेसने कोणतीही विकासकामे केली नाहीत. जनतेने हे जाणले आहे. त्यामुळे काँग्रेस आता पुढे जाऊ शकत नाही.

Related posts

ठाण्यातून राष्ट्रवादीचे ‘गणेश नाईक’ यांना उमेदवारी मिळणार का ?

News Desk

रिपब्लिकन पक्षाला मिळणारे राज्यातील एक मंत्रिपद अविनाश महातेकर आणि भुपेश थुलकर यांना विभागून देणार

News Desk

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk