मुंबई | महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना आज धुळवडी दिवशी मात्र रूग्णसंख्येत घट झाली आहे.त्यामुळे आज महाराष्ट्राला दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत. महत्वाची बाब म्हणजे रविवारी राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. तर शनिवारी राज्यात तब्बल ३५ हजार ७२६ नवे रुग्ण वाढले होते.त्यामुळे गेल्या दोन दिवसांच्या आकडेवारीच्या तुलनेत आज मात्र रूग्णसंख्येत घट झाल्याने महाराष्ट्रासाठी समाधानकारक बाब आहे.
राज्यात आज ३१ हजार ६४३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २० हजार ८५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांचा आकडा २७ लाख ४५ हजार ५१८ इतका झाला आहे. तर २३ लाख ५३ हजार ३०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५४ हजार २८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ३ लाख ३६ हजार ५८४ सक्रिय रुग्ण आहेत.
Maharashtra reports 31,643 new #COVID19 cases, 20,854 recoveries and 102 deaths in the last 24 hours.
Total cases 27,45,518
Total recoveries 23,53,307
Death toll 54,283Active cases 3,36,584 pic.twitter.com/aDdcl0jn2W
— ANI (@ANI) March 29, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.