HW News Marathi
Covid-19

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती केली आहे. राज्य सरकारकडून आज (२५ मे) या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील या जम्बो सुविधा नेमक्या कोणकोणत्या ? जाणून घेऊया…

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

१. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (१००० बेड्सची जम्बो सुविधा). याच ठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही.

२. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु. ६०० बेड्सची सुविधा यात १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड १९च्या मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

३. नेसको गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी.

४. रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात.

५. ३१ मेपर्यंत एसएससीआय वरळी,महालक्ष्मी, बांद्रा, व नेसको, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत.

६. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली.

७. स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था.

८. मुंबईतील खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून होणार त्यामुळे कोणत्या ठिकाणी खाटा उपलब्ध आहेत ते लगेच कळेल. खाटांचा डाटा रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये. प्रत्येक बेडला युनिक आयडी. डिस्चार्ज धोरणाची कडक अंमलबजावणी.

९. रुग्णालयांची स्वच्छता, जेवण व इतर अनुषंगिक बाबींतून डीन यांची जबाबदारी कमी केली. आरोग्य उपचारांवर अधिक लक्ष देता येणे शक्य.

१०. रुग्णवाहिका १०० वरून ४५० वर. या सेवेसाठी देखील मोबाईल अॅप.

१०. केइएम,नायर, सायन, जेजे, सेंट जॉर्ज आणि बीएमसी पेरिफेरल रुग्णालये यांची जबाबदारी ५ आयएएस अधिकाऱ्यांकडे. प्रत्येक रुग्णालयात वॉर रूम . सीसीटीव्ही

११. मनपातर्फे दररोज ७ लाख अन्नाची पाकिटे वाटप.

१२. मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक, १९१६ हेल्पलाईनवर ६५ हजार कॉल्स आत्तापर्यंत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 1.0: आजपासून देशात १० टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालये सुरु

News Desk

ही नॅशनल न्यूज नाही ! राजेश टोपेंचे धक्कादायक विधान

News Desk

राज्यात आज ८९४३ नवे रुग्ण तर रिकव्हरी रेट ७०.०९%

swarit