HW News Marathi
महाराष्ट्र

व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्मिकच्या 61 व्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद!

मुंबई। शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावरील अन्यायाला ‘मार्मिक’मधून वाचा फोडली. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन सरकारी आणि सरकारी व्यवस्थेला जेरीस आणण्याचं काम केलं होतं. अशा एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्मिकचा 61 वा वर्धापन दिन आज साजरा झाला. हा संपूर्ण कार्यक्रमक दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यास अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्मिकचे वाचक आणि शिवसैनिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

मार्मिकने सगळ्यांनाच आत्मविश्वास दिला

भाषण करायची सवय आता जात चालली आहे. सभेची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो अशी व्हायची. या शिवाय सुरुवात होऊच शकत नाही. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे दूरदृश्यप्रणालीद्वारे आपण भेटत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं शुक्लकाष्ट मागे लागलं आहे. त्यामुळे आपण कार्यक्रम असा साजरा करत आहोत. मार्मिकची सुरुवात आपल्याला ठाऊकच आहे. नव्या पिढीला ते कदाचित ठाऊक नसेल. मार्मिकबद्दल जे स्किट आता आपण पाहिले त्यावेळी प्रमोद नवलकरांची आठवण झाली. त्यांचा यात मोठा सहभाग राहिला आहे. मार्मिकने सगळ्यांनाच आत्मविश्वास दिला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अन्याय करत असेल तर त्याच्या छाताडावर पाय देण्याची हिम्मत

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शिवसेनाप्रमुख आणि माझे काकाही मावळा या नावाने व्यंगचित्र काढत होते. तो लढा मुंबई घेऊन महाराष्ट्राने यशस्वी केला. त्यादेखील 61 वर्षे झाली. मराठी माणूस आळशी आहे असं कुणी म्हणत असेल, तो व्यवसाय करायला धजावत नाही असं कुणी म्हणत असेल. मात्र, मराठी माणूस लढ्यासाठी कधी मागेपुढे पाहत नाही. कुणी अन्याय करत असेल तर त्याच्या छाताडावर पाय देण्याची हिम्मत मराठी माणूस दाखवतो. ही हिम्मत आजही आहे, कालही होती आणि उद्याही असणार आहे. तर अशा पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्र लढ्याचं ते आंदोलन यशस्वी झालं.

न्यूझीलंडवरुन ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले

आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून चांदा ते बांदा माझे शिवसैनिक मला स्क्रिनवर दिसत आहेत. ही मोठी चळवळ या व्यंगचित्रातून निर्माण केली गेली आहे. शिवसेना ही एकमेव अशी संघटना आहे जी एका व्यंगचित्रकाराने आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून जन्माला घातली आणि उभी केली आहे. पाहता पाहता तिची किर्ती ही महाराष्ट्र नाही, देश नाही तर जगभर पोहोचली. एका ब्रशचे फटकारे काय करुन दाखवू शकतात, याचं उदाहरण मला यापेक्षा तरी वेगळं आठवत नाही. एक नक्की की शिवसेनाप्रमुख व्यंगचित्रात ज्याला आपला गुरु मानायचे ते डेव्हिड लो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात न्यूझीलंडवरुन ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आणि तिथून ते हिटलरवर फटकारे मारायचे. तेव्हा हिटलरने डेव्हिड लो यांना कुठल्याही पद्धतीनं ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. एका व्यंगचित्रकाराची ताकद काय असते हे डेव्हिड लो यांनी दाखवून दिलं होतं.

बाळासाहेबांनी सांगितलेल्या काही गोष्टी

एक चित्रकार आणि व्यंगचित्रकार यातील फरक काय? उत्कृष्ट व्यंगचित्रकार हा पहिला उत्कृष्ट चित्रकार असलाच पाहिजे. पण उत्कृष्ट चित्रकार हा चांगला व्यंगचित्रकार असेलच असं नाही. व्यंगचित्रकाराला शरीरशास्त्र हे अवगत पाहिजेच. चेहरा आणि शरीर याचं प्रमाण त्याला कळलंच पाहिजे. म्हणजे चित्रकार किंवा चित्र याचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र. चित्रकार हा एक उत्तम प्रोट्रेट काढेल. पण व्यंगचित्रकार हा त्याच्या पलिकडे जातो. मला आठवतंय की, बाळासाहेबांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत. ते जेव्हा फ्री प्रेस जर्नलमध्ये होते. इतर जे काही व्यंगचित्रकार होते. त्यातील एक व्यंगचित्रकार असा खूप विचार कर बसलेला होता की काय करायचं? काय करायचं? बाळासाहेब म्हणाले माझं काम झालं पण तो व्यक्ती अजून विचारच करत होता. लंच टाईम झाला त्यावेळी मी त्याला विचारलं की काय रे काय झालं. तेव्हा तो म्हणाला की मला नेहरु रडताना दाखवायचे आहेत. पण ते रडतानाचे संदर्भ नाहीत मिळत. तर नेहरु रडतानाचे संदर्भ कसे मिळणार? एकदा एक चेहरा, त्याची रचना कळाल्यावर त्याच्यात वेगवेगळे हावभाव दाखवणं हे व्यंगचित्रकाराचं खरं कसब आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील! – अनिल परब

Aprna

मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीची NIA चौकशी करा, मनसेची मागणी!

News Desk

महाविकासआघाडी सरकारकडून OBC समाजाची कोंडीच, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Aprna